सर्वात चांगली गुंतवणूक कोणती ?

सर्वांच्या मनात हा प्रश्न येतो

सर्वात चांगली गुंतवणूक कोणती ?

View Results

Loading ... Loading ...

या प्रश्नाचे उत्तर सर्वांकरिता सारखे नसू शकते. कारण प्रत्येकाच्या गरजा वेगळ्या आहेत. म्हणजे एकाच वयाचे लोक वेग वेगळ्या जवाबदाऱ्या सांभाळत असतील तर त्यांच्या गरजा वेगळ्या असतील.

एक २१ वर्षाचा अजूनही शिक्षण घेत असू शकतो तर दुसरा नोकरी करत असेल. कोणाची नोकरी कमी धोक्याची असेल कोणाची जास्त. कोणाला एकदम पैसे मिळत असतील तर कोणाला पगार.
कोणाला वडिलोपार्जित संपत्ती मिळाली असेल तर कोणाला कर्ज. कोणाच्या घरात ३ व्यक्ती कोणाच्या ७. कोणी नोकरी वारंवार बदलत असेल कोणी सरकारी. कोणाला घर विकत घ्यायचे असेल तर कोणाला विकायचे.

म्हणून गुंतवणूक करताना सल्लागार असणे फारच चांगली गोष्ट आहे. कारण आपला मित्र करतोय तीच गोष्ट मी करावी हे बरोबर नाही. तुमचा मित्र चूक करत असेल तर तुम्हीही करावी का ? म्हणून मित्र नातेवाईक यांचे ऐकण्यापेक्षा सल्लागाराचे ऐका. सर्वच सल्लागार चांगले असतात असे नाही. सल्लागाराची निवड करताना तो प्रामाणिक आहे का, त्याचे ज्ञान कसे आहे हे जाणणे फार आवश्यक आहे.

म्युच्युअल फंड मध्ये तुम्हाला १ दिवस ते १०० वर्ष गुंतवणूक करणाऱ्या योजना मिळू शकतात. तेही विविध क्षेत्रांमध्ये, जसे की सोनं, बांधकाम, ऑटो, खाणेपिणे, बँक, किंवा बॉण्ड्स. त्यामुळे सल्लागाराच्या मदतीने गुंतवणूक करणे योग्य. अन्यथा एवढ्या योजनांमध्ये, चुकीच्या योजना निवडल्या जाऊ शकतात.

गुंतवणूक म्हणजे काय ? इथे वाचा

गुंतवणुकीचे प्रकार काय आहेत ? इथे वाचा

म्युच्युअल फंड, ह्या सर्वात जास्त निवडलेल्या पर्यायाविषयी माहिती इथे पहा.

इतर सर्वेक्षण येथे पहा

Leave a Comment

म्युच्युअल फंड वितरकाशी बोला